आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Central EWS Certificate (सेन्ट्रल EWS दाखला)

केंद्र शासनाच्या नोकऱ्या, शिक्षण प्रवेश परीक्षा (जसे NEET, JEE, UPSC) आणि विविध आरक्षणांमध्ये वापरण्यात येणारे EWS (Economic Weaker Section) प्रमाणपत्र हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सामान्य वर्गातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ₹८,००,००० पेक्षा कमी असेल आणि ती व्यक्ती अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), किंवा इतर मागासवर्गीय (OBC) यामध्ये येत नसेल, तर ती व्यक्ती केंद्रीय EWS प्रमाणपत्रासाठी पात्र असते. Central EWS Certificate (सेन्ट्रल EWS दाखला)
महाराष्ट्रात हे प्रमाणपत्र Talathi, तहसीलदार किंवा SDM कार्यालयामार्फत मिळवता येते. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि अर्जाची प्रक्रिया यांचा तपशील या लेखात दिलेला आहे.

पात्रता (Eligibility)
  • अर्जदार सामान्य वर्गातील असावा (SC/ST/OBC नसावा)
  • वार्षिक उत्पन्न ₹८,००,००० पेक्षा कमी असावे
  • शहरी भागात १००० स्क्वे.फूट पेक्षा लहान घर असावे
  • ग्रामीण भागात ५ एकरपेक्षा कमी शेती असावी
आवश्यक कागदपत्रे
  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • १९६७ पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा, चुलते)
  • शाळा सोडलेला दाखला / जन्म दाखला / बोनाफाईड (अर्जदार)
  • १ वर्षाचा उत्पन्न दाखल
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • घराचा उतारा (१००० स्क्वेअर फुटच्या आतील)
  • ७/१२, ८ अ किंवा फेरफार उतारा (५ एकरच्या आतील)
  • १ फोटो
इतर माहिती
  • प्रमाणपत्राची वैधता सहसा १ वर्ष असते
  • नवीन अर्ज दरवर्षी करावा लागतो
  • हे प्रमाणपत्र UPSC, NEET, JEE, शासकीय नोकऱ्या इ. साठी आवश्यक आहे
  • Talathi/तहसील कार्यालय किंवा SDM कडे अर्ज करता येतो
Central EWS Certificate (सेन्ट्रल EWS दाखला)
अर्जेंट 1 दिवसात डोमिसाईल कसे काढावे
  • प्रथम अर्ज करा
  • अर्जाचे टोकन घ्या
  • ते टोकन घेऊन तालुका तहसील ऑफिस मध्ये जावा
  • ते टोकन तहसीलदार सेतू विभाग आहे तिथे दाखवा
  • त्यांना सांगा अर्जंट पाहिजे ते लगेच करून देतील
  • अशा प्रकारे एका दिवसात तुम्हला दाखला मिळेल
कोठे उत्पन्न दाखला काढता येते?
१. तहसील कार्यालय (तालुक्याचे मुख्यालय)

२. मंडल अधिकारी कार्यालय (महसूल विभाग तालुका पातळीवर)

३. उपविभागीय अधिकारी कार्यालय (SDO / SDM Office - शहर भागासाठी)

४. जिल्हाधिकारी कार्यालय (विशेष प्रकरणे / त्रुटी सुधारणा)

५. सेतू केंद्र किंवा सुविधा केंद्र (जिल्हा / उपनगर भागात)

६. Maha e-Seva CSC केंद्रे (ग्रामपंचायत/बाजार भागात)

७. Aaple Sarkar पोर्टल (ऑनलाइन अर्ज)

८. Aaple Sarkar Seva Mobile App (मोबाईलवरून अर्ज)

९. MahaOnline सेवा केंद्र (तालुका / जिल्हा डिजिटल सेवा सुविधा)
No more posts to show

Print Details

Share This Page
Scroll to Top